|| जय मल्हार ||

।। माळेगाव यात्रा ।।

जिल्हा परिषद, नांदेड

विभागांची माहिती

 • महिला व बाल विकास कल्याण विभाग

  दक्षिण भारतातील प्रसिध्द माळेगांव यात्रेत महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी स्टॉल लावुन विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येते. महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना मार्फत देण्यात येणा-या सेवांची माहिती तसेच बालकांच्या आहाराबाबत विविध पाककृतींची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात.
  तसेच सदरील यात्रेदरम्यान सुदृढ बालक स्पर्धा व किशोरवयीन मुत्री व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिक देण्यात येते.

 • आरोग्य विभाग

  श्री मल्‍हारी म्‍हाळसाकांत खंडोबा यात्रा माळेगाव येथे उपलब्‍ध करुन देण्‍यात येणारी आरोग्‍य सेवा.....
  दक्षिण भारतातील प्रसिध्‍द असलेल्‍या श्री मल्‍हारी म्‍हाळसाकांत खंडोबा यात्रा माळेगाव ता.लोहा यात्रेत महाराष्‍ट्रातील व राज्‍याबाहेरीलही भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेत लहान मुले,गर्भवती माता व वृध्‍द व्‍यक्‍तीही मोठ्या प्रमाणात येतात. यात्रेतील होणारी गर्दी पहाता विविध साथींचे आजार जसे पटकी,गॅस्‍ट्रो,अतिसार, आमांश,ताप,सर्दी इत्‍यादीचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.तसेच अन्‍न विषबाधेचाही धोका असतो.तद्वतच गर्दीच्‍या ठिकाणी अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही.
  या अनुशंगाने यात्रेत येणा-या भाविकांचे आरोग्‍य अबाधित रहावे या करीता आरोग्‍य विभागाव्‍दारे वैद्यकिय पथकांमार्फत मोफत तातडीचे वैद्यकिय उपचार, औषधोपचार, प्रसुती विषयक सेवा,जखमींवर उपचार करण्‍यात येतात व मोफत संदर्भ सेवा पुरविली जाते.यात्रा कालावधीत इमरजन्‍सी मेडीकल सर्व्‍हीसेस (108) टोल फ्री क्रमांकाच्‍या रुग्‍णवाहीका उपलब्‍ध करुन दिल्‍या जाते.
  तसेच साथरोग प्रतिबंधात्‍मक कार्यवाही जाते. यामध्‍ये यात्रेत सर्व संबधितांकडून शुध्‍द पाणी पुरवठा करणे बाबत व स्‍वच्‍छता ठेवणे बाबत पाठपूरावा व आरोग्‍य शिक्षण करण्‍यात येऊन, शुध्‍द पाणी पुरविले जात आहे किंवा नाही या करीता पाण्‍याचे ओ.टी.परिक्षण केल्‍या जाते व पाणी नमुने तपासणी करीता प्रयोगशाळेत पाठविले जातात. तज्ञ वैद्यकिय पथकांव्‍दारे उपचार व साथरोग विषयक सर्व्‍हेक्षण केले जाते. कोविड कालावधीमध्‍ये वैद्यकिय पथकांव्‍दारे तपासण्‍या व उपचार करण्‍यात आले होते.
  तसेच थूंकी दुषित क्षयरुग्‍ण शोधण्‍याकरीता थूंकी परिक्षण करणे व कुष्‍ठरुग्‍ण शोधणे इत्‍यादी सेवा उपलब्‍ध करुन दिल्‍या जातात.या अनुशंगाने वैद्यकिय पथके कार्यन्वित ठेवली जातात.
  तसेच आरोग्‍य विषयक राष्‍ट्रीय कार्यक्रम व विविध आरोग्‍य विषयक शासकिय योजनांची जनजागृती व प्रसिध्‍दी स्‍टॉल उभारुन करण्‍यात येते व लाभ देण्‍यात येतो.
  सदरील प्रसिध्‍दीस्‍टॉल मधून प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजना,जननी सूरक्षा योजना,जननी शिशू सूरक्षाकार्यक्रम,राष्‍ट्रीय कुटूंब कल्‍याण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम, असंसर्गिक आजार नियंत्रण कार्यक्रम एन.सी.डी.या विविध आरोग्‍य विषयक शासकिय योजनांची जनजागृती करण्‍यात येते.

  प्रधानमंत्री मातृवंदना योजनाः- योजनेतील अटी व शर्तींच्‍या अधीन राहून पहील्‍या गर्भवती मातेच्‍या पहील्‍या अपत्‍यास रु. 5000/- चा आर्थीक लाभ तीन टप्यात व दुसरे अपत्‍य मुलगी असल्‍यास रुपये 6000/- चा आर्थिक लाभ दिला जातो.

  प्रधानमंत्री जन आरोग्‍य योजना :- प्रधान मंत्री जन आरोग्‍य योजना हा केंद्रशासनाचा महत्‍वाकांक्षी कार्यक्रम असून याच धर्तीवर राज्‍य शासनाने सूध्‍दा महात्‍मा ज्‍योतिबा फुले जन आरोग्‍य योजना चालू केली आहे. यामध्‍ये पात्र लाभार्थिंचे आयुष्‍यमान कार्ड तयार करुन वितरीत करण्‍यात येते.यांमध्ये २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार पिवळी शिधापत्रिका धारक, केशरी शिधापत्रिका धारक, अन्नपूर्णा कार्ड धारक, शुभ्र शिधापत्रिका धारक (शासकीय व निमशासकीय कर्मचारी सहित) व इतर निकषात बसणारे सर्व लाभार्थी आहेत.या योजने अंतर्गत 05 लक्ष रुपयांपर्यंत मोफत वैद्यकिय उपचार शासनाने निर्धारीत केलेल्‍या रुग्‍णालयातून दिले जातात.

  जननी सुरक्षा योजना :- या योजनेच्‍या माध्‍यमातून अनूसूचित जाती,जमाती व दारीद्र्य रेषेखालील मातांना संस्‍थेत प्रसुतीसाठी आर्थिक लाभ दिला जात असून,रुग्‍णवाहीका, प्रयोगशालेय तपासणी,औषधोपचार,या सुविधा मोफत पु‍रविल्‍या जातात.

  राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रम :- या कार्यक्रमा अंतर्गत अंगणवाडी व शाळेतील बालकांचे विविध गंभीर आजाराबाबत तपासणी,उपचार व शस्‍त्रक्रिया केली जाते.
  तसेच राष्‍ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम,एडस् नियंत्रण, किटकजन्‍य आजार नियंत्रण कार्यक्रम, अंधत्‍व निर्मुलन कार्यक्रम, सिकल सेल नियंत्रण कार्यक्रम, राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व कायदा,राष्‍ट्रीय आयुष कार्यक्रम, सिकल सेल आजार नियंत्रण कार्यक्रम, वैद्यकिय गर्भपात कायदा, प्रजनन व बाल आरोग्‍य कार्यक्रम, नियमित लसीकरण कार्यक्रम, पौंगडावस्‍थेतील मुला मुलींचे प्रजनन व लैंगिक आरोग्‍य शिक्षण, राष्‍ट्रीय मानसिक आरोग्‍य कार्यक्रम, टेलीमेडीसीन , ई संजीवनी कार्यक्रम,टेली कन्‍सलटेशन कार्यक्रम व अवयव दान याबाबत माहितींचे स्‍टॉल तयार करुन संबधित कार्यक्रमांसबधित सेवा पुरविले जाते व जनजागृती करण्‍यात येते.

 • कृषी विभाग

  श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत कृषि प्रदर्शनात शेती औजाराचे स्‍टॉल आले असून शेती औजारे खरेदीसाठी शेतक-यांनी गर्दी केली आहे. शेती औजारांमध्‍ये खुरपणी यंत्र, आंतरमशागती करीता टीलर, गहू, सोयाबिन, साळी व कमरे एवढया उंचीच्‍या पिकांची कापणी करण्‍याकरीता सोंगणी यंत्र यात्रेकरुंचे लक्ष वेधत होते. दुध काढण्‍याची मशीन, कडबा कुट्टी, गवत कापणी यंत्र, सायकल हात कोळपे, कडबा कुट्टी कम भरडा मशिन, कापूस पराटी श्रेडर, मिनी ट्रॅक्‍टर चलित पेरणी यंत्र, चायना मॉडल चाफ कटर, मिल्कींग मशिन, ऑटो पेरणी यंत्र कम वखर, हाय प्रेशर वॉशर, एअर कॉम्‍प्रेसर, पोर्टेबल वॉटर पंप, पॅकींग मशीन, लोखंडी बैल गाडी, मॅन्‍युअल टोकन यंत्र, ठिबक व अक्सेसरीस ग्रेव्‍ही मशीन, मिरची कांडप यंत्र, शेवयी मशीन, ऑटोमॅटिक कापड मशीन, धान्‍य क्लिनिंग मशीन, ग्रेडर पॉलिशर, खड्डे खोदणी मशीन, पिठाची मिनी गिरणी, बॅग पॅक ब्रश कट आदी शेती उपयुक्‍त औजारे विक्रीसाठी आले होते. विविध कंपण्‍यांनी शेती औजारे दहा टक्‍के सवलतीच्‍या दरात तर जास्‍त किंमतीची औजारे पन्‍नास टक्‍के अनुदानावर विक्रीसाठी उपलब्‍ध होतात.

 • पशुसंवर्धन विभाग

  श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा -
  माळेगाव यात्रेत पशु प्रदर्शनात विविध कुंत्र्यांच्या जातीमध्ये राँट, ब्रिलर, लाँबर डॉग आदी कुत्र्यांच्या जाती हजेरी लावतात.
  विविध पशूमध्ये घोडे, गाढव, उंट, कोंबडे तसेच विविध जातीचे कुत्रे पहावयास मिळाले.
  विविध जातींचे अश्व
  घोडे बाजार हे माळेगाव यात्रेचे आकर्षण आहे. येथे विविध जातीचे अश्व दाखल झाले आहेत. यात्रेत यावेळी सिंध, काठेवाड, धारवाड, पंजाब, नुकरा, स्टँलिकन, बाँडा, हुलकारी, पंचकल्याण आदी जातीचे अश्व दाखल आहेत. यावेळी अश्वांच्या विविव कवायती प्रेक्षकांना दाखविल्या जातात.

 • उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान

  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेड यांच्यावतीने माळेगाव येथे महिला स्वयं सहायता समूहाने बनविलेल्या उत्पादन वस्तू विक्रीचे स्टॉल उभारण्यात येतात. जिल्ह्यातील विविध विभागातून बचत गटांचे स्टॉल येथे वस्तू विक्रीसाठी लावले आहेत. यात पापड, मसाला, लोणचे, लघुउद्योग झुणका भाकर, खारोडी, दही धपाटा, शेवया, मिरची पावडर, हळद, पारंपारिक पद्धतीने बनवलेले झाडू, विणकाम, येथे कुंटूर येथील महालक्ष्मी व गिरजामाय महिला स्वयंसहायता समूहांनी मेंढीच्या केसापासून बनवलेली घोंगडी स्टॉलमध्ये मुख्य आकर्षण ठरते. घोंगडीची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे. घोंगडीसह मेंढीच्या केसापासून कोट आणि मफरेल या गटाने विक्रीसाठी ठेवले जातात.
  विणकाम, हातमाग, शोभेच्या वस्तू, प्रकाश दिवे, बिबा गोडंबी, पायपुसणी, आसनपट्टी, रान तरोट्याची चहापत्ती, शेवग्याच्या पानाचे पापड, अशा विविध वस्तूंचे विक्री स्टॉल उभारण्यात येतात. या भव्य विक्री प्रदर्शन सोहळ्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा परिषद नांदेडच्या माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून करण्यात येते.

 • पाणी पुरवठा विभाग

  नांदेडसह परभणी लातूर जिल्हाच्या सिमेच्या मध्यवर्ती असलेल्या माळेगाव येथे दक्षिण भारतातील खंडोबाची मोठी यात्रा भरते, या यात्रेत पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद नांदेड मार्फत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व यात्रेत येणाऱ्या प्राण्यांसाठी शुध्द पाणी पुरवठा करण्यात येत असतो.
  खंडोबाच्या माळेगाव दररोज सरासरी किमान दोन-तिन लाख भाविक यात्रेत दर्शनासाठी येत असतात. तसेच यात्रेत उंट, घोडा, गाढव, कुत्रा, शेळी आदी पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शुध्द पाणी पुरवठा केला जात आहे.
  उर्ध्व मानार प्रकल्पातील मुख्य विहीरीवरून शुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पाणी आणलं जातं. कृषी प्रदर्शन, कुस्ती मैदान, लोककला महोत्सव परिसर, घोडा लाईन, आदी ठिकाणी शुध्द पाणी पुरवठा करण्यात येतो.

 • ग्रामपंचायत विभाग

  यात्रेचे स्वरूप

  नांदेडसह परभणी लातूर जिल्हाच्या सिमेच्या मध्यवर्ती असलेल्या माळेगाव येथे दक्षिण भारतातील खंडोबाची मोठी यात्रा भरते, या यात्रेत पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद नांदेड मार्फत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व यात्रेत येणाऱ्या प्राण्यांसाठी शुध्द पाणी पुरवठा करण्यात येत असतो.
  खंडोबाच्या माळेगाव दररोज सरासरी किमान दोन-तिन लाख भाविक यात्रेत दर्शनासाठी येत असतात. तसेच यात्रेत उंट, घोडा, गाढव, कुत्रा, शेळी आदी पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने शुध्द पाणी पुरवठा केला जात आहे.
  उर्ध्व मानार प्रकल्पातील मुख्य विहीरीवरून शुध्दीकरण प्रकल्पापर्यंत पाणी आणलं जातं. कृषी प्रदर्शन, कुस्ती मैदान, लोककला महोत्सव परिसर, घोडा लाईन, आदी ठिकाणी शुध्द पाणी पुरवठा करण्यात येतो.

  दिवस स्‍वरूप
  1) पहिला दिवस देवस्‍वारी (पालखी) मिरवणुक व
  विविध स्‍टॉलचे उद्दघाटन
  2) दुसरा दिवस विविध स्‍पर्धा , कृषी प्रदर्शन व
  पशुप्रदर्शन
  3) तिसरा दिवस कुस्‍त्‍यांची दंगल
  4) चौथा दिवस लावणी महोत्‍सव
  5) पाचवा दिवस कला महोत्‍सव व समारोप कार्यक्रम

  जागे बाबत तपशिल

  अ.क्र. विवरण गट क्रमांक क्षेत्र हेक्‍टर आर
  1 सरकारी गायरान 453 8.68
  2 सरकारी गायरान 469 26.11
  3 सरकारी जमिन 762 20.85
  4 लोकल फंड(सरकार) 594 56.56
  5 बंगला रेस्‍ट हाऊस 592 0.77
  6 गांव तलाव 593 5.11
  7 गांव तलाव 453 0.45
  8 स्‍मशानभुमी 434 1.95
  9 मसाई देवुळ 494 0.03
  एकुणः- 120.5
 • समाज कल्याण विभाग

  श्री क्षेत्र माळेगाव यात्रा दि .10.01.2024. ते 14.01.2024 पर्यंत आहे.
  सदर माळेगाव यात्रेमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत समाज कल्याण, जिल्हा परिषद, नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची प्रचार- प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यामध्ये दि.10.01.2024 रोजी स्टॉलचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असुन तदनंतर उन्नतीशील महिला मंडळ नांदेड या संस्थेव्दारा व्यसनमुक्ती या विषयावर कला पथकाव्दारे कार्यक्रम सादर करण्यात येईल.
  दि.11.01.2024 रोजी राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, लोहा यांचे मार्फत पथनाटय सादर करण्यात येईल. दि.12.01.2024 रोजी कलाकारामार्फत आंतर जातीय विवाह, भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती व इतर महत्वाच्या योजनाची गीत गायनाव्दारे प्रसिध्दी करण्यात येईल.
  दि.13.01.2024 रोजी राजीव हेल्थ व्यसनमुक्ती व पनुर्वसन केंद्र लोहा , येथील ॲडमीट असलेल्या रुग्णामार्फत कला पथक सादर करण्यात येईल.
  दि.14.01.2024 रोजी दिव्यांग विद्यार्थ्या मार्फत गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात येईल.
  यासोबतच दि.10.01.2024. ते 14.01.2024 या कालावधीत समाज कल्याण विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनाचे घडी पुस्तिका वाटप व सर्व योजनांची माहीती स्टॉल ला भेट देण्याऱ्या सर्व भाविक भक्तांना देण्यात येवून सर्व योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यात येणार आहे.